Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेची रक्कम वाढणार : निर्मला सितारामन 

 

ताजी बातमी/ऑनलाइन टीम

 

Mudra Loan : नुकताच नव्या सरकारचे म्हणजेच मोदी सरकार 3.0 चे पहिले आर्थिक बजेट सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेती, युवावर्ग , महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बाबत मोठ्या घोषणा करण्यात आली आहे.

 

आता यामध्ये आपण पाहू की मुद्रा कर्ज रकमेची जी रक्कम वाढवली आहे त्याची माहिती. एम एस एम इ आणि मॅन्युफॅक्चरिंग या विभागावर विशेष लक्ष देत अर्थमंत्र्यांनी एका मोठ्या कर्जाच्या रकमेबाबत घोषणा केली आहे.

 

Mudra Loan: यामध्ये आतापर्यंत मुद्रा कर्जाची मर्यादा दहा लाखापर्यंत होती. ती रक्कम आता दुप्पट करण्यात आली आहे म्हणजेच हे मुद्रा कर्ज आता आपणाला 20 लाखांपर्यंत मिळणार आहे.