सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) २०२५-२६ या वर्षासाठी भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ६,१८० तंत्रज्ञांच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामधील १८० पदे तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नलसाठी आहेत, तर उर्वरित ६,००० पदे तंत्रज्ञ ग्रेड ३ च्या पदांसाठी आहेत. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया २८ जून रोजी सुरू होणार असून इच्छुक उमेदवारी २८ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
पात्रता निकष–
तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नल या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, आयटी किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बीएससी पदवी किंवा संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे. RRB Technician Recruitment 2025
तंत्रज्ञ ग्रेड ३ पदासाठी उमेदवारांनी १० वी उत्तीर्ण (एसएसएलसी/मॅट्रिक्युलेशन) आणि फाउंड्रीमन, मोल्डर, पॅटर्न मेकर, किंवा फोर्जर आणि हीट ट्रीटर सारख्या विशिष्ट ट्रेडमध्ये आयटीआय किंवा
वयोमर्यादा – RRB Technician Recruitment 2025
ग्रेड १ सिग्नल पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे असावे
ग्रेड ३ सिग्नल पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे असावे
राखीव श्रेणींसाठी सरकारी नियमांनुसार वयात सूट लागू आहे.
अर्ज शुल्क-
२५० रुपये: अनुसूचित जाती/जमाती, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (सीबीटीमध्ये उपस्थित राहिल्यावर पूर्णपणे परत करण्यायोग्य) RRB Technician Recruitment 2025
५०० रुपये: इतर सर्व श्रेणी (सीबीटीमध्ये उपस्थित राहिल्यावर ४०० रुपये परत करण्यायोग्य)
पगार-
तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नल: वेतन स्तर ५, दरमहा २९,२०० रुपये
तंत्रज्ञ ग्रेड ३: वेतन स्तर २, दरमहा १९,९०० रुपये
७ व्या केंद्रीय वेतन आयोग (सीपीसी) नुसार अतिरिक्त भत्ते आणि फायदे मिळतील.
अर्ज कुठे करावा?
२८ जून रोजी पासून आरआरबीची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in द्वारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.