सरकारी नोकरीचे स्वप्न? ‘या’ बँकेत परीक्षेविना भरती जाहीर

इंडियन बँकेत नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने २०२६ साठी ऑफिसर JMG स्केल-१ आणि क्लर्क पदांसाठी भरती जाहीर केली असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.

 

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पात्र उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेच्या माध्यमातून सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळणार आहे. चला, या भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

Bank job: इंडियन बँकेत नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने २०२६ साठी ऑफिसर JMG स्केल-१ आणि क्लर्क पदांसाठी भरती जाहीर केली असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पात्र उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेच्या माध्यमातून सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळणार आहे. चला, या भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. अर्ज सुरू होण्याची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ तर अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६ असणार आहे.

 

या भरतीसाठी वयोमर्यादा ही किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २६ वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गांना ३ ते ५ वर्षांची सूट असणार आहे.

या भारतासाठी आवश्यक पात्रता ही खालीलप्रमाणे असणार आहे.

 

ऑफिसर JMG स्केल-१

मान्यताप्राप्त मंडळातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. उमेदवार खेळाडू असावा आणि त्याने देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.

 

क्लर्क:

ज्युनियर राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले १२ वी उत्तीर्ण उमेदवार पात्र. तसेच विद्यापीठ संघाचे सदस्य किंवा आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये अव्वल तीन स्थान मिळवलेले उमेदवारही पात्र.

 

इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. “Current Openings” विभागात भरतीची लिंक निवडा. नोंदणी करून लॉग-इन करा. IBPS पोर्टलवर आवश्यक माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरा. अर्जाची प्रिंटआउट जतन करा. या भरतीसाठी लेखी परीक्षा नाही. स्क्रीनिंग, क्रीडा चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची (CSE 2026) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यंदा ९३३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.