महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार विविध कर्ज व अनुदान योजना राबवत आहे. पीएम मुद्रा, प्रधानमंत्री रोजगार सृजन, लखपती दीदी, स्टँड अप इंडिया यांसारख्या योजनांमुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे.

 

काही योजनांमध्ये तारणाशिवाय कर्ज, तर काहींमध्ये अनुदान आणि व्याजमुक्त कर्जाची सुविधा आहे. तसेच SHE मार्टस सारख्या उपक्रमांमुळे महिलांना मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

 

१) पीएम मुद्रा लोन योजना

 

या योजनेत तारणाशिवाय कर्ज दिले जाते. आधी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते, आता ते २० लाखांपर्यंत वाढवले आहे.

 

शिशु कर्ज : ५०,००० रुपयांपर्यंत

 

किशोर : ५०,००० ते ५ लाख

 

तरुण : ५ लाख ते १० लाख

 

तरुण प्लस : १० लाख ते २० लाख

 

या योजनेसाठी इथे अर्ज करा – https://www.mudra.org.in/

 

2) प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम (PMEGP)

 

स्वरोजगारासाठी ही योजना आहे. प्रकल्पाच्या खर्चावर १५ ते ३५ टक्के अनुदान मिळते. ९.५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. व्याजदर साधारण ११ ते १२ टक्के असतो.

 

या योजनेसाठी इथे अर्ज करा – https://www.kviconline.gov.in/

 

३) लखपती दीदी योजना

 

महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज उपलब्ध आहे. या योजनेमुळे ग्रामीण आणि लहान उद्योगांना चालना मिळत आहे.

 

या योजनेसाठी इथे अर्ज करा – http://www.lakhpatididi.gov.in/

 

४) स्टँड अप इंडिया योजना

 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी ही योजना आहे. १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ७ वर्षांपर्यंत परतफेडीची मुदत असते आणि १८ महिन्यांची सवलत मिळू शकते.

 

या योजनेसाठी इथे अर्ज करा – https://www.standupmitra.in/

 

५) तारणाशिवाय लघुउद्योग कर्ज

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण महिलांसाठी १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत तारणाशिवाय कर्ज दिले जाते. छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही योजना उपयुक्त आहे.

 

या योजनेसाठी इथे अर्ज करा – http://www.myscheme.gov.in/