बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
या भरती मोहिमेद्वारे एकूण ११६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
SBI Jobs : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ११६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. SBI कडून जाहीर करण्यात आलेल्या या भरतीमध्ये विविध तांत्रिक आणि आर्थिक पदांचा समावेश आहे. यामध्ये AVP सिस्टम ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर (IS Audit) आणि डेप्युटी मॅनेजर (CA) यांसारखी महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. आयटी, कॉम्प्युटर सायन्स, माहिती प्रणाली ऑडिट आणि चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.
AVP सिस्टम ऑफिसर पदासाठी उमेदवारांकडे बी.ई., बी.टेक किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभवालाही महत्त्व दिले जाणार आहे. डेप्युटी मॅनेजर (IS Audit) पदासाठी संबंधित शैक्षणिक पात्रतेसोबत माहिती प्रणाली ऑडिट क्षेत्रातील अनुभव किंवा CISA प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर डेप्युटी मॅनेजर (CA) पदासाठी उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट (CA) असणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत केली जाणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांनी केलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना १०० गुणांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. जर दोन उमेदवारांना समान गुण मिळाले, तर वयाने मोठ्या असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, पदानुसार किमान वय २३ ते २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर कमाल वयोमर्यादा ३५ ते ४२ वर्षांपर्यंत असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम sbi.co.in/careers या वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर संबंधित भरतीची जाहिरात निवडून ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करावे. पुढे नवीन नोंदणी करून आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी लागेल. तसेच फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
अर्ज करताना सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवावी. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. बँकिंग आणि तांत्रिक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी SBI ची ही भरती मोठी संधी मानली जात आहे.