लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. (Funds)फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिनादेखील अर्धा संपला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, महिलांच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेत दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्षात प्रत्यक्ष महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी निधी पास केला जाऊ शकतो. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
लाडकी बहीण योजनेत १५ एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. (Funds) या महिन्यात निधी मंजूर झाल्यानंतर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाईल.पुढच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे त्याआधी मागच्या वर्षीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, (Funds) केवायसीमध्ये अनेक महिलांनी चुका केल्या आहेत. या चुका सुधारल्यानंतरच आता महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. त्याआधी महिलांनी हे काम करायचे आहे अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाहीत. केवायसी केल्यानंतर महिलांना रखडलेले सर्व हप्ते एकत्र दिले जाणार आहे. डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे डिसेंबर ते मार्च असे ४ हप्ते महिलांना दिले जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ६००० रुपये जमा केले जातील.