सरकारी कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
ईपीएफओमध्ये सध्या भरती सुरु आहे. ईपीएफओने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.
ईपीएफओमधील ही भरती डिविजन क्लर्क आणि ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट पदासाठी आहे. देशातील २३ क्षेत्रांमध्ये ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुकांनी १ एप्रिलपर्यंत अर्ज करायचा आहेत. या नोकरीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.
१०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
ईपीएफओमधील या नोकरीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी माहिती वाचा.
पगार
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टिंग केली जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे. परीक्षा २ मे रोजी होऊ शकते.
ईपीएफओच्या या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. सर्वात आधी वेबसाइटवर जायचे आहे. तिथे संबंधित भरती लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा त्यानंतर लॉग इन करा. तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. यानंतर तुम्ही प्रिंट आउट काढा.