बंपर सरकारी भरती! तब्बल 3003 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी; पाहा कोण करु शकतं अर्ज?

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच SSC सिलेक्शन पोस्ट फेज १४ भरती २०२६ साठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३,००३ पदे भरली जाणार आहे. ही पदे विविध स्तरांची आहेत: नेमकी कोणाकोणासाठी ही पदं आहेत आणि कोण अर्ज करु शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

अर्ज केव्हापर्यंत करावा?

 

अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ मे २०२६ असून, शुल्क भरण्याची अंतिम मुदत ५ मे २०२६ ही आहे. अर्जातील चुका दुरुस्त करण्याची विंडो ११ मे ते १३ मे २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. अर्ज करताना चुका करणाऱ्यांना त्या दुरुस्त करण्याची याकाळाता संधी मिळणार आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेच्या आत अर्ज भरा आणि तो काळजीपूर्वक तपासा.

 

ही भरती कोणासाठी आहे?

 

ही भरती दहावी, बारावी आणि पदवी पूर्ण केलेल्या सर्व तरुणांसाठी आहे. आयोगाने विविध पात्रतेनुसार वेगवेगळी पदे जाहीर केली आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षण आणि पात्रतेनुसार योग्य पदाची निवड करू शकता.

 

अर्जासाठी काय करावे?

 

१. SSCच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट द्या.

२. सिलेक्शन पोस्ट फेज-१४ भरती २०२६ ची लिंक शोधा.

३. ऑनलाइन नोंदणी करा.

४. सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा.

५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

६. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.

७. अर्ज सादर केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट काढून घ्या.

 

ही भरती विविध विभाग आणि मंत्रालयांमधील गट ‘ब’ आणि गट ‘क’ स्तरावरील पदांसाठी आहे. निवड लेखी परीक्षेवर (CBT) आधारित असेल. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी शक्य तितक्या लवकर अर्ज भरावा आणि अंतिम मुदतीची वाट पाहू नये, कारण शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाइटवर जास्त भार पडल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. एसएससी फेज १४ भरती २०२६ ही स्थिर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या हजारो तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. आपल्या पात्रतेनुसार अर्ज भरा आणि तयारी सुरू करा.