हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) आपल्या देशभरातील ९ रिजन्समधील कार्यालयांत ज्युनियर असिस्टंट एकूण १८० पदांची भरती. राज्यनिहाय रिक्त पदांची विभागणी केलेली आहे. LIC HFL मध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्युनियर असिस्टंट्सची एकूण २५ पदे रिक्त आहेत.
(अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर प्रत्येक १ पद; मुंबई/नवी मुंबई/ठाणे – ८ पदे; नागपूर – ३, नाशिक – ५, पुणे/पिंपरी/चिंचवड – ३ पदे)
पात्रता – ( १ एप्रिल २०२६ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (दूरस्थ / पत्रव्यवहार / अर्धवेळ पद्धतीने घेतलेली पदवी पात्र नाही.) आणि संगणक चालविण्याचे ज्ञान.
वयोमर्यादा – ( १ एप्रिल २०२६ रोजी) २१ ते ३० वर्षे. प्रोबेशन कालावधी – सहा महिन्यांचा असेल, जो आणखी ६ महिन्यांनी वाढविला जाऊ शकतो. वेतन – दरमहा रु. ३८,७०९/-, रु. ३९,९०९/- आणि रु. ४१,५०९/- (कामाचे ठिकाण/शहर कॅटेगरी III, II आणि I अनुसार क्रमाने) अधिक इतर सुविधा. (मेडी क्लेम, ग्रॅच्युईटी, ग्रुप इन्श्युरन्स स्कीम, हाऊसिंग लोन, परफॉरमन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह इ.) निवड पद्धती – ऑनलाइनएक्झाम (जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात) आणि इंटरव्ह्यू.
ऑनलाइनएक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ २०० प्रश्न, २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (परीक्षेचे माध्यम इंग्रजी) (१) इंग्लिश लँग्वेज, (२) लॉजिकल रिझनिंग, (३) जनरल अवेअरनेस (हाऊसिंग फिनान्स इंडस्ट्रिविषयी अधिक भर), (४) न्यूमरिकल अॅबिलिटी, (५) कॉम्प्युटर स्किल प्रत्येकी ४० प्रश्न, ४० गुण.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. मुलाखत – मुलाखतीच्या वेळी कागदपत्र पडताळणी केली जाईल. मुलाखतीत किमान पात्रतेचे गुण मिळविणे आवश्यक. अंतिम निवड यादी ऑनलाइनपरीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीवर आधारित बनविली जाईल. मेडिकल एक्झामिनेशन – निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल एक्झाम द्यावी लागेल. अर्जाचे शुल्क – रु. ८००/- १८टक्के जीएस्टी.
ऑनलाइनअर्ज https://www.lichousing.com या वेबसाईटवर ३० एपिल २०२६ पर्यंत करावेत.परीक्षा केंद्र – मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, एमएमआर, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती. कोल्हापूर, जळगाव.ऑनलाइन एक्झामसाठी कॉल लेटर https://www.lichousing.com या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. ऑनलाइन अर्ज करताना काही अडचण आल्यास https://cgrs.ibps.in/ या वेबसाईटवर क्युरी `LIC HFL-Recruitment’ असे सब्जेक्टमध्ये लिहून पाठवू शकता.