मुलींसाठी खास योजना! २१ वर्षांची झाल्यानंतर मिळणार ७१.८२ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

लेकीच्या शिक्षणासाठी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. शिक्षण खूप महागलं आहे. उच्च शिक्षणासाठी लाखो रुपये फी भरावी लागते. हे एवढे पैसे एकदम जमा करणे शक्य होत नाही. यासाठीच सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

 

लेकीच्या शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. या योजनेत टॅक्स बेनिफिटदेखील मिळते याचसोबत व्याजदेखील चांगले मिळते. दरम्यान, या योजनेत तुम्हाला २० वर्षांसाठी गुंतवणूक करायची असते. यामुळे तुम्हाला लाखो रुपये मिळतील.

 

२१ वर्षानंतर मिळणार एवढे पैसे

 

जर तुम्ही लेकीच्या पहिल्या वाढदिवसापासून दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवले. एकूण १५ वर्षांसाठी पैसे जमा करायचे असतात. परंतु अकाउंट २१ वर्षानंतर मॅच्युर होते. त्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

 

सध्या सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. तुम्ही १५ वर्षांसाठी २२.५ लाख रुपये गुंतवणार आहेत. २१ वर्षापर्यंत तुम्हाला ४४.७५ लाख रुपये मिळू शकतात. २१ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला जवळपास ७१.८२ लाख रुपये मिळू शकतात.

 

सुकन्या समद्धी योजना ही मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. मुलींचे भविष्य उज्जवल व्हावे. त्यांना कधीही आर्थिक अडचण येऊ नये. यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत सर्वाधिक व्याजदर मिळते. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कमदेखील जास्त असते. यामुळे तुम्हाला भविष्यात खूपच फायदा होईल.