SSC CGL 2026 नोटिफिकेशन जारी! 12,256 जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या परीक्षा तारखा ते अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर

देशाच्या कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC ने 21 मे 2026 रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर SSC CGL 2026 ची नोटिफिकेशन जाहीर केली आहे. यानुसार आता ‘संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026’ (Combined Graduate Level Examination 2026) अंतर्गत 12,256 रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

कोणत्या पदासाठी?

 

संपूर्ण भारतातील विविध मंत्रालये, विभाग आणि सरकारी कार्यालयांमध्ये ‘गट-ब’ आणि ‘गट-क’ पदे भरण्यासाठी SSC CGL 2026 परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.. या भरती प्रक्रियेद्वारे केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

 

SSC CGL 2026 महत्त्वाच्या तारखा

 

अर्ज करण्याची तारीख – 21 मे 2026 पासून सुरू

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2026 (रात्री 11 वाजेपर्यंत)

 

परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख – 23 जून 2026 (रात्री 11 वाजेपर्यंत)

 

अर्जामध्ये सुधारणा करण्याची तारीख – 29 जून ते 1 जुलै 2026 (रात्री 11 वाजेपर्यंत)

 

टीयर 1 परीक्षा – ऑगस्ट- सप्टेंबर 2026

 

टीयर 2 परीक्षा – डिसेंबर 2026

 

SSC CGL टीयर 1 परीक्षा अभ्यासक्रम

 

SSC CGL टीयर 1 परीक्षा 200 गुणांची असून 50 मार्कसाठी 4 विषय असतील. यात प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न 2 मार्कसाठी असून 1/4 मार्क चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील. टीयर 1 साठी विषय पुढीलप्रमाणे –

 

सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क (General Intelligence & Reasoning)

 

सामान्य ज्ञान (General Awareness)

 

संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)

 

इंग्रजी आकलन (English Comprehension)

 

SSC CGL 2026 साठी अर्ज कसा करावा?

 

सर्वप्रथम SSC Login Portal या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

होमपेजवर दिसणाऱ्या “New User? Register Now” या पर्यायावर .

 

आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

 

नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.

 

त्यानंतर SSC CGL 2026 चा अर्ज काळजीपूर्वक भरा.

 

पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरीच्या स्कॅन कॉपी अपलोड करा.

 

अर्जातील सर्व माहिती पुन्हा तपासून अंतिम सबमिट करा.

 

अर्ज फी म्हणून 100 रुपये ऑनलाइन भरून फॉर्म सबमिट करा.

 

महत्त्वाची सूचना

 

SSC CGL 2026 परीक्षा प्रक्रिया ‘Tier 1’ आणि ‘Tier 2’ अशा दोन टप्प्यांत होणार आहे. यात ‘Tier 1’ परीक्षा पास होणारे उमेदवार ‘Tier 2’ परीक्षेसाठी बसण्यास पात्र असतील. परीक्षा प्रवेशपत्र, परीक्षा वेळापत्रक आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी उमेदवारांनी नियमितपणे SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.