Jio, Airtel सह Vi च्या ग्राहकांसाठी खुशखबर! वर्षभर रिचार्जची चिंता मिटली

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध प्रकारचे शॉर्ट-टर्म आणि लॉन्ग-टर्म रिचार्ज प्लॅन्स देतात. जर तुम्हाला कमी खर्चात वर्षभर वैधता असलेला प्लॅन हवा असेल, तर या कंपन्यांकडे काही किफायतशीर पर्याय उपलब्ध आहेत.

 

जिओचा वार्षिक प्लॅन : Jio चा 3,599 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा, दररोज 100 मोफत SMS आणि Google Gemini Pro चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जर तुम्हाला फक्त कॉलिंगसाठी प्लॅन हवा असेल, तर Jio चा 1,748 रुपयांचा व्हॉइस-ओन्ली प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता मिळते.

 

एअरटेलचा स्वस्त वार्षिक प्लॅन : एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्येही अनेक वार्षिक प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन 1,849 रुपयांचा असून तो व्हॉइस-ओन्ली प्लॅन आहे. यात 365 दिवसांची वैधता आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. डेटासह प्लॅन हवा असल्यास Airtel चा 2,249 रुपयांचा प्लॅन निवडता येईल. यात 365 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि संपूर्ण कालावधीसाठी 30GB डेटा दिला जातो.

 

Vi चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन : देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vi कडेही वार्षिक प्लॅन्स उपलब्ध आहेत. Vi चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन 1,849 रुपयांचा असून तो व्हॉइस-ओन्ली प्लॅन आहे. यात केवळ कॉलिंगची सुविधा मिळते.

 

कोणता प्लॅन तुमच्यासाठी योग्य? : फक्त कॉलिंगसाठी: Airtel/Vi – 1,849, Jio – 1,748 (336 दिवस. डेटासह स्वस्त पर्याय: Airtel – 2,249. जास्त डेटा हवा असल्यास: Jio – 3,599 (दररोज 2.5GB). दैनिक डेटा आणि वर्षभर वैधता: Vi – 3,499 (दररोज 1.5GB)