महामार्गावर वाहन चालकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAIकडून विविध सेवा, सुविधा पुरवल्या जातात. लांब पल्ल्याच्या प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून टोल प्लाझावर स्वच्छतागृहे उभारली आहेत.
मात्र अनेकदा ही स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. तिथली दुर्गंधी पाहून प्रवाशांना मनस्ताप होतो. मात्र आता अशाच अस्वच्छ स्वच्छतागृहांसाठी NHAIने एक महत्त्वाचा नियम बनवला आहे.
आता टोल प्लाझावरील अस्वच्छतेचा फटका केवळ प्रवाशांनाच बसणार नाही, तर संबंधित टोल चालकालाही बसेल. जर तुम्हाला प्रवासात एखाद्या टोलवर गलिच्छ टॉयलेट दिसले, तर त्याचा फोटो काढून तुम्ही अधिकृत पोर्टलवर तक्रार करू शकता. महत्त्वाचं म्हणजे तक्रार योग्य ठरल्यास संबंधित प्रवाशाच्या FASTag खात्यात 1,000 रुपये जमा केले जाणार आहेत. ही रक्कम रोख स्वरूपात न देता थेट FASTag वॉलेटमध्ये जमा केली जाईल, ज्याचा वापर पुढील टोल पेमेंटसाठी करता येईल.
Toll Rules: टोल प्लाजाजवळ राहणाऱ्यांना टोल पूर्णपणे फ्री असतो? NHAI ने सांगितलं ‘आय कार्ड’च्या नियमाचं सत्य
गलिच्छ टॉयलेटचा फोटो काढा आणि जिंका 1000 चे FASTag रिचार्ज!
टोलच्या नियमांसोबतच NHAI ने राष्ट्रीय महामार्गांवर स्वच्छता राखण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखी मोहीम सुरू केली आहे. महामार्गावरील प्रवाशांना स्वच्छ प्रसाधगृहांची सुविधा मिळावी यासाठी 30 जून 2026 पर्यंत ‘क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज’ सुरू करण्यात आले आहे.
जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला कोणत्याही टोल प्लाजावर अस्वच्छ किंवा गलिच्छ टॉयलेट दिसले, तर तुम्ही त्याची तक्रार करून थेट बक्षीस मिळवू शकता, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ने दिली.