जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडे ग्राहकांसाठी अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. आज आपण 195 रुपये आणि 200 रुपयांच्या दोन डेटा व्हाउचर प्लॅन्सची तुलना करून कोणता प्लॅन अधिक फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत.
दोन्ही प्लॅन्समध्ये OTT सुविधांचा लाभ मिळतो. मात्र, फक्त 5 रुपये अधिक खर्च करून 200 रुपयांचा प्लॅन घेणे फायदेशीर का आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
रिलायन्स जिओचा 200 रुपयांचा प्लॅन
जिओचा 200 रुपयांचा प्लॅन ‘OTT Pass’ म्हणून ओळखला जातो. हा प्लॅन अनेक OTT प्लॅटफॉर्म्सच्या सुविधांसह येतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून त्यात 30GB हाय-स्पीड डेटा मिळतो. यात अमॅझॉन प्राईम, युट्यूब प्रिमियम, सोनी लिव्ह, जिओ हॉटस्टार, लायन्सगेट प्ले, झी 5, सननेक्स्ट, डिस्कव्हरी प्लस, प्लॅनेट मराठी, कच्चा लंका, होईचोई, चौपाल, टाइम्स प्ले, फॅनकोड, जिओ टीव्ही, तरंग प्लस यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळतो. हा प्लॅन तुमच्या आधीपासून सुरू असलेल्या बेस प्रीपेड प्लॅनसोबतच वापरता येतो. मात्र, या प्लॅनमध्ये स्वतंत्र सर्व्हिस व्हॅलिडिटी, एसएमएस किंवा व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात नाही.
रिलायन्स जिओचा 195 रुपयांचा प्लॅन
जिओचा 195 रुपयांचा प्लॅन देखील OTT सुविधांसह येतो. मात्र, या प्लॅनमध्ये फक्त JioHotstar चे सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असून त्यात 15GB डेटा मिळतो. याशिवाय, JioHotstar चे फायदे 90 दिवसांसाठी उपलब्ध राहतात. हा प्लॅन देखील केवळ सक्रिय बेस प्लॅनसोबतच वापरता येतो.
कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?
या दोन्ही प्लॅन्समधील किंमतीचा फरक केवळ 5 रुपयांचा आहे. मात्र, 200 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30GB डेटा मिळतो, तर 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 15GB डेटा दिला जातो. म्हणजेच फक्त 5 रुपये अधिक देऊन दुप्पट डेटा मिळतो. याशिवाय, 200 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळतो, तर 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त JioHotstar ची सुविधा आहे. त्यामुळे डेटा आणि OTT लाभांचा विचार करता, 200 रुपयांचा प्लॅन अधिक फायदेशीर पर्याय ठरू शकतो.