कोणत्याही हमीशिवाय मिळतंय 2 लाखांपर्यंत कर्ज; शेतकऱ्यांनो असा करा अर्ज

देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, शेती करत असताना त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकार सातत्याने नवनवीन आणि लोककल्याणकारी योजना राबवत असते.

मुलगी जन्माला आली तर सरकारकडून आर्थिक आधार; ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ कसा मिळेल?

सरकारी योजनेचा लाभ मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. अंतर यातील अशा काही योजना आहेत ज्या अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या नाहीत. अशीच एक योजना जी कदाचित तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्ही विसरला असाल ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना.

स्वाभिमान निधी योजना: लाडकी बहीण योजनेप्रमाणे महिलांना मिळणार दरमहा 2000 रुपये?

देशातील शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेची खास बाब म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणतीही हमी किंवा जमीन गहाण न ठेवता तब्बल २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. यापूर्वी ही मर्यादा १.६० लाख रुपये होती.

कोणत्याही हमीशिवाय मिळतंय 2 लाखांपर्यंत कर्ज; शेतकऱ्यांनो असा करा अर्ज

क्रेडिट कार्ड योजनेसाठी मूळ कर्जावरील व्याजदर ७ टक्के आहे. मात्र वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून व्याज सवलत मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष व्याजदर केवळ ४ टक्क्यांपर्यंत खाली येतो. कमी व्याजदरामुळे पीक कर्ज, बियाणे, खते, औषधे तसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चासाठी हे कर्ज फायदेशीर ठरते. Kisan Credit Card Yojana

कंपनी सचिव होण्यासाठी आता ‘अभय योजना’! काय आहे संकल्पना, विद्यार्थ्यांचा फायदा कसा?

विशेष म्हणजे आता केवळ पीक उत्पादक शेतकरीच नव्हे, तर दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, डुक्करपालन आणि मत्स्यव्यवसाय करणारे शेतकरीही KCC योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच आरबीआयच्या प्रस्तावित नियमांनुसार KCC ची वैधता ६ वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे.

 

कोण करू शकतो अर्ज?

वय १८ ते ७५ वर्षे असलेले अर्जदार

स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी

भाडेकरू व वाटेकरी शेतकरी

स्वयं-सहायता गट (SHG) व संयुक्त दायित्व गट (JLG) सदस्य

पशुपालक, दुग्धव्यवसायिक आणि मत्स्यव्यवसायिक (Kisan Credit Card Yojana)

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र

जमिनीचे सातबारा/फेरफार किंवा भाडेकराराचा पुरावा

बँक पासबुक व खात्याचा तपशील

पासपोर्ट आकाराचे फोटो

पीक पेरणीचा दाखला

 

अर्ज कसा कराल?

 

शेतकरी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. संबंधित बँकेच्या वेबसाइटवर जाऊन KCC अर्ज भरता येतो. तसेच जवळच्या सरकारी, खासगी किंवा ग्रामीण बँक शाखेत जाऊन अर्ज सादर करता येतो. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे ७ ते १४ कामकाजाच्या दिवसांत KCC कार्ड जारी केले जाते. कमी व्याजदर, कोणत्याही हमी शिवाय मिळणारे कर्ज आणि सोपी प्रक्रिया यामुळे किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक बळकटी देणारी महत्त्वाची योजना ठरत आहे