इचलकरंजी
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी 300 बेडनुसार पदनिर्मितीस राज्य शासनाच्या सार्वजनिक आराेग्य विभागाने मंजुरी दिल्याने रुग्णालयाच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या या निर्णयामुळे आराेग्य सेवांमध्ये सुधारणा हाेणार असून आधुनिक सुविधा आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे.
कमी कागदपत्रांत Personal Loan कसा मिळवावा? अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
सरकार लाडक्या भावांच्या बँक खात्यात टाकणार १५००० रुपये, काय आहे नवी योजना?
इचलकरंजी शहर, हातकणंगले व शिराेळ हे दाेन तालुके आणि नजीकच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे आधारवड बनले आहे. याठिकाणी सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला हाेता. शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर 200 बेडचे असलेले हे रुग्णालय 300 बेडचे करण्यासाठी राज्य शासनाने मान्यताही दिलेली आहे. परंतु याठिकाणी 300 बेडच्या मानाने आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनीयुक्त करण्यासाठी आमदार आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने या रुग्णालयासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध देणेसंदर्भात त्यांनी शासनाकडे प्रयत्न सुरु ठेवले हाेते. सध्या रुग्णालयात वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवत हाेती. शासनाच्या मंजुरीमुळे विविध संवर्गातील नवीन पदे निर्माण हाेऊन रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत हाेणार आहे.
Loan: अर्जंट कर्ज कसे मिळेल? जाणून घ्या सोपे मार्ग, महत्त्वाच्या अटी आणि स्मार्ट पर्याय
बुधवारी सार्वजनिक आराेग्य विभागाने श्रेणीवर्धित इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी मंजूरी दिली असून तसा अध्यादेशही जारी केला आहे. त्यानुसार 5 वैद्यकिय अधिकारी गट अ वर्ग 2 (अतिदक्षता विभागासाठी 3 आणि शुश्रुषा कक्षसाठी 2), 1 मुख्य प्रशासकीय अधिकारी वर्ग 1, 1 सहाय्यक अधिक्षक/कारभारी/लेखापाल, 1 वरिष्ठ लिपिक/भांडार लिपिक, 1 कनिष्ठ लिपिक/टंकलेखक वर्ग 3, 7 परिसेविका, 25 अधिपरिचारीका, 1 ईसीजी तंत्रज्ञ, 2 औषध निर्माता/मिश्रक/औषध निर्माण अधिकारी, 1 स्वच्छता निरिक्षक, 10 कक्षसेवक, 16 साईगार, 2 शिपाई, 1 न्हावी, 1 मुख्य स्वयंपाकी, 1 सहाय्यक स्वयंपाकी, 3 स्वयंपाकी अशी विविध 79 पदांची निर्मिती केली जाणार आहे.
या निर्णयामुळे भविष्यात रुग्णालय अधिक सक्षमपणे आराेग्य सेवा देईल. रुग्णालयातील आराेग्यसेवा अधिक प्रभावी व दर्जेदार हाेणार असून डाॅक्टर, परिचारिका तसेच इतर तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाèयांची उपलब्धता वाढणार आहे. नवीन पदनिर्मितीमुळे डाॅक्टर व कर्मचाèयांवरील कामाचा ताण कमी हाेऊन रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध हाेणार आहेत, असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक आराेग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे माेलाचे सहकार्य लाभल्याचेही आमदार आवाडे म्हणाले. तर लवकरच रक्त केंद्र, रक्त विघटन केंद्र, कॅथलॅब, एमआरआय आदी सुविधाही लवकरच उपलब्ध हाेणार आहेत.