लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण ‘या’ 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत (Maharashtra Ladki Bahin Yojana ₹3000 payment) आहेत.

 

मात्र, जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने त्यांच्यात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.

 

दरम्यान, प्रशासनाकडून रखडलेले हप्ते लवकरच वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यांचे प्रत्येकी १,५०० रुपये असे एकूण ३,००० रुपये एकत्र लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही तांत्रिक आणि पात्रतेशी संबंधित अडचणीही समोर आल्या आहेत. अनेक महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसणे किंवा पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणे यांसारख्या कारणांमुळे त्यांचा लाभ तात्पुरता रोखण्यात आला आहे.

 

अधिकृत माहितीनुसार, अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे ८० लाखांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, रखडलेले हप्ते लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी होत आहे.

 

आता जून महिन्याची रखडलेली रक्कम आणि जुलै महिन्याचा नियमित हप्ता एकत्र जमा होणार का, याकडे राज्यातील लाखो ‘लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. सरकारकडून याबाबत लवकरच अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.