नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; ५३४ पदांसाठी भरती..

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. नाशिक येथील ‘करन्सी नोट प्रेस’ (Currency Note Press) द्वारे विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

 

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ५३४ रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. Currency Note Press Nashik Bharti

 

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार cnpnashik.spmcil.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच २० एप्रिल रोजी सुरू झाली आहे. १९ मे २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

 

पदाचे नाव & तपशील:

 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 वेल्फेअर ऑफिसर 02

2 सेफ्टी ऑफिसर 01

3 सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल) 27

4 सुपरवायझर (TO – प्रिंटिंग) 25

5 सुपरवायझर (IT) 06

6 सुपरवायझर (TO – मेकॅनिकल) 07

7 सुपरवायझर (TO – AC) 03

8 सुपरवायझर (TO – इलेक्ट्रिकल) 08

9 सुपरवायझर (TO – इलेक्ट्रॉनिक्स) 09

10 सुपरवायझर (इंक फॅक्टरी) 03

11 सुपरवायझर (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग) 03

12 सुपरवायझर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) 03

13 सुपरवायझर (TO – सिव्हिल) 03

14 सुपरवायझर (TO – इन्स्ट्रुमेंटेशन) 01

15 सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज) 01

16 सेक्रेटेरियल असिस्टंट 01

17 आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन) 01

18 ज्युनियर ऑफिस असिस्टंट 22

19 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 108

20 ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) 227

21 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 12

22 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) 15

23 ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट) 08

24 ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 20

25 ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / फिटर) 03

26 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन) 01

27 ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर) 02

28 ज्युनियर टेक्निशियन (एअर कंडिशनिंग) 02

29 ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – अटेंडंट ऑपरेटर) 03

30 ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – लॅबोरेटरी असिस्टंट) 03

31 ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग) 02

32 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) 02

Total 534

पात्रता काय ?

 

१०वी उत्तीर्ण किंवा आयटीआय, अभियांत्रिकी पदविका, पदवी/पदव्युत्तर पदवी. (पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे.) किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि पदनिहाय कमाल वय २५/२८/३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ESM: 1000/- रुपये. [SC/ST/PwBD: 200/- रुपये]

वेतनश्रेणी (Pay Scale) : 18,780/- रुपये ते 1,03,000/- रुपये.