इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

भारतीय सैन्यात (Indian Army) अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन आर्मीने १४४ व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स म्हणचेच ‘टीजीसी १४४’ (TGC 144) च्या भरतीची अधिकृत सूचना दिली आहे.

 

या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ११ जून २०२६ पर्यंत इच्छुक उमेद्वार सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

भारतीय सैन्याकडून एकूण ३० जागांसाठी ही भरती काढण्यात आली असून विविध इंजिनिअरिंगच्या जागांचा समावेश यामध्ये आहे. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेद्वारांना ‘इंडियन मिलिट्री अकादमी’ देहरादून येथे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणानंतर उमेद्वारांना थेट लेफ्टनंट पदावर नियुक्ती दिली जाईल. सैन्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेद्वारांची निवड शॉर्टलिस्टिंग, एसएसबी इंटरव्यू, मेडिकल टेस्ट आणि मेरीट लिस्टच्या आधारे केली जाईल.

 

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

 

या भरतीसाठी केवळ अविवाहित पुरुष उमेद्वारच अर्ज करू शकतात. उमेद्वारांकडे संबंधित स्ट्रीममधील बीई किंवा बी टेक (BE/B.Tech) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कंम्युटर सायन्सच्या उमेद्वारांसाठी एम.एस्सी (M.Sc Computer Science) पदवी देखील ग्राह्य धरली जाईल.

तसेच विदेशी विद्यापीठातून इंजिनिअरिंग केलेले उमेद्वार या भरतीसाठी पात्र असणार नाहीत.

उमेद्वारांचे वय १ जानेवारी २०२७ रोजी २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. वयाची गणना १० वीच्या प्रमाणपत्रावरील जन्मतारखेनुसार केली जाईल.

 

वेतन श्रेणी आणि स्टायपेंड (Salary & Stipend)

 

निवड झालेल्या उमेद्वारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा ५६,१०० रूपये स्टायपेंड दिला जाईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर उमेद्वारांना लेफ्टनंट रँक मिळेल. यानुसार ‘लेव्हल-१०’ अंतर्गत मूळ वेतन ५६,१०० ते १,७७,००० रूपयांपर्यत असेल. याशिवाय इतर भत्ते मिळून एकूण वार्षिक सीटीसी (CTC) सुमारे १७ ते १८ लाखांपर्यंत असेल. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.