सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनण्याची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज?

केंद्र सरकारमध्ये अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी चयन आयोगाने (SSC) SSC CGL 2026 परीक्षेच्या माध्यमातून इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर (आयकर निरीक्षक) या अत्यंत प्रतिष्ठित पदासह इतर अनेक केंद्रीय विभागांमधील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या आयकर विभागात देशसेवेसह मानाची नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेची पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि पगाराबाबतची सर्व माहिती समोर आली आहे.

 

मुख्य जबाबदाऱ्या (Job Profile)

‘इनकम टॅक्स इन्स्पेक्टर’ या पदावर निवड झालेल्या उमेदवारांवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. यामध्ये प्रामुख्याने करविषयक प्रकरणांची सखोल चौकशी करण, विविध आर्थिक आणि कर दस्तऐवजांची तपासणी करणे, आयकर विभागाशी संबंधित इतर अंतर्गत व प्रशासकीय कामकाज सांभाळणे अशी कामे करावी लागणार आहे. यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.

 

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

 

निवड प्रक्रिया कशी असेल?

या पदासाठी उमेदवारांची निवड ‘एसएससी सीजीएल’ परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल. ही प्रक्रिया खालील टप्प्यात पार पडेल.

 

टियर-१ परीक्षा (Tier 1): ही पहिली चाळणी परीक्षा असेल.

टियर-२ परीक्षा (Tier 2): टियर-१ मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना या मुख्य परीक्षेत बसावे लागेल.

गुणवत्ता यादी : दोन्ही टप्प्यांमधील कामगिरीच्या आधारे अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल. यानंतर अंतिम टप्प्यात कागदपत्रांची तपासणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

वेतन आणि इतर भत्ते

इनकम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी पे लेव्हल-८ (Pay Level 8) अंतर्गत अतिशय आकर्षक वेतन दिले जाते. यानुसार सुरुवातीला दर महिना ४७,६०० बेसिक पे मिळेल. याशिवाय सरकारी नियमांनुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि इतर अनेक शासकीय सुविधांचा लाभही मिळेल,.

 

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जा.

तिथे तुमची OTR (One Time Registration) प्रक्रिया पूर्ण करा.

त्यानंतर SSC CGL 2026 Application Link वर क्लिक करून आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरा.

मागितलेली कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.

सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट काढून सुरक्षित ठेवा.