सांगली जिल्हा बँक 445 लिपिक पदांची भरती स्थगित,पूर्ण माहिती

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लेखनिक पदांच्या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

बँकेच्या संचालक मंडळाने आयबीपीएस (IBPS) मार्फत ४४४ कनिष्ठ लेखनिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार २४ जूनपासून ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच भरतीला स्थगिती देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि परीक्षेबद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच मित्रांनो या IBPS नुसार सेट केलेले पेपर्स या लिंक वर मोफत सरावासाठी उपलब्ध आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

या भरतीवरून सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात ही भरती होणार नसल्याचा दावा केला होता. तर आमदार सदाभाऊ खोत यांनी लेखी परीक्षा असताना संचालक मंडळाकडे उमेदवारांना दहा गुण देण्याचा अधिकार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उपनिबंधक कार्यालयानेही आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरच भरती प्रक्रियेबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र सहकार व वस्त्रोद्योग विभागाकडून गुरुवारी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना पाठवण्यात आले आहे.

 

स्थानिक बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्त माहिती नुसार सांगली ज़िल्हा सहकारी बँक ४४४ पदांची मोठ्ठी भरती सुरु होत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या ४४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘IBPS ‘ या राष्ट्रीयीकृत व महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील कंपनीमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली. या भरतीसाठी मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. थेट, पोस्ट किंवा कुरिअरद्वारे आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीची सविस्तर माहिती, आवश्यक पात्रता व तपशील मंगळवारपासून बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. या भरतीची पूणर माहिती आम्ही महाभरतीवर लवकरच अपडेट करू.

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत “लिपिक” पदाची 444रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सांगली डीसीसी बँक भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२६आहे.

 

सांगली डीसीसी बँक भरती २०२६

 

पदाचे नाव – लिपिक

पदसंख्या – 444 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – सांगली

वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे

अर्ज शुल्क- Rs. 1000/- + 180 (18% GST) = 1,180/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Through IBPS)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जुलै २०२६

अधिकृत वेबसाईट – https://www.sanglidccbank.com/

Sangli DCC Bank Vacancy 2026

 

पदाचे नाव पदसंख्या

लिपिक 444

Educational Qualification For Sangli DCC Bank Recruitment 2026

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

लिपिक Graduate in any discipline with MS-CIT or equivalent computer course (computer eligibility certificate as per Govt. of Maharashtra letter no 277/39 dated 4 Feb.2013 e.g. MS-CIT, D.O.A.C.C./ N.E.I.L.I.T New Delhi’s certificate)L.I.T New Delhi’s certificate)