बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या या 5 योजना बदलतील तुमचं नशीब, मिळू शकतं तब्बल 2 कोटींपर्यंत कर्ज!

भारतात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध कर्ज व अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना कोणतीही जमीन तारण न ठेवता किंवा कमी हमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकते.

 

त्यामुळे नवउद्योजक आणि लहान व्यवसायिकांसाठी ही मोठी संधी आहे.

 

1. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)

 

नवीन आणि लघु उद्योजकांसाठी ही लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जते. यात तीन प्रकार आहेत.

 

शिशु लोन – 50,000 पर्यंत

 

किशोर लोन – 5 लाखांपर्यंत

 

तरुण लोन – 10 लाखांपर्यंत

 

या योजनेत कोणतीही गॅरंटी न देता व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.

 

2. PMEGP योजना

 

प्राइम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम (PMEGP) कार्यक्रमांतर्गत उत्पादन क्षेत्रासाठी 25 लाख रुपये आणि सेवा क्षेत्रासाठी 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते.यामध्ये 15% ते 35% पर्यंत सबसिडी मिळते, ज्यामुळे कर्जाचा मोठा भाग कमी होतो. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक भागात रोजगार उपलब्ध व्हावा असा उद्देश आहे.

 

3. CGTMSE योजना

 

क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस (CGTMSE) ही योजना सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही तारण न ठेवता बँकांकडून कर्ज मिळू शकते.

 

या योजनेत 2 कोटींपर्यंतचे कर्ज मिळू शकतं.

 

कर्जाची मंजुरी संबंधित बँक तुमची आर्थिक स्थिती, व्यवसाय योजना आणि पात्रता तपासून देते.

 

या कर्जासाठी सरकार बँकेला गॅरंटी कव्हर प्रदान करते, त्यामुळे बँकेचा धोका कमी होतो.

 

ही योजना विशेषतः अशा उद्योजकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांच्याकडे जमीन किंवा मालमत्ता तारण ठेवण्यासाठी नाही.

 

याशिवाय, या योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर सुमारे 85% पर्यंत गॅरंटी कव्हर उपलब्ध असतो

 

4. CLCSS योजना

 

क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम (CLCSS) ही MSME उद्योगांसाठी असलेली सरकारी योजना असून जुन्या मशिनरीच्या जागी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मशिनरी बसवण्यासाठी प्रोत्साहन देते. या योजनेत पात्र उद्योजकांना सुमारे 15% पर्यंत कॅपिटल सबसिडी मिळते, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, खर्च कमी होतो आणि व्यवसायाचे आधुनिकीकरण होते.

 

5. SIDBI SMILE योजना

 

SIDBI ची SMILE (SIDBI Make in India Soft Loan) ही योजना MSME व्यवसाय विस्तारासाठी आर्थिक मदत देते. या योजनेत नवीन युनिट सुरू करणे किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सॉफ्ट टर्म लोन उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत –

 

मशिनरी किंवा प्रोजेक्टसाठी सुमारे 10 लाख ते 25 लाखपर्यंत कर्ज मिळू शकते.

 

कर्जाची परतफेड सुलभ हप्त्यांमध्ये केली जाते आणि साधारणपणे 7 ते 10 वर्षांपर्यंत परतफेडीची मुदत दिली जाते.

 

59 मिनिट MSME लोन योजना

 

’59 मिनिट MSME लोन योजना’ ही केंद्र सरकारची एक डिजिटल कर्ज मंजुरी प्रणाली आहे, ज्यामध्ये GST आणि ITR भरलेले लघु व्यावसायिक या योजनेत अर्ज करू शकतात.

 

या योजनेत 1 लाख ते 5 कोटींपर्यंत कर्जासाठी प्राथमिक मंजुरी फक्त 59 मिनिटांत मिळू शकते. त्यानंतर बँकेकडून प्रत्यक्ष तपासणीनंतर कर्ज दिले जाते. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असते, त्यामुळे कागदपत्रांची अडचण कमी होते आणि वेळ वाचतो.