जून महिना अवघ्या काही दिवसानी संपणार आहे. अशातच येत्या 1 जुलैपासून देशभरात काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.
आधार कार्ड ते गॅस सिलिंडरसह काही महत्वाच्या गोष्टींबद्दलच्या नियमांत बदल होणार आहेत. यामुळे वेळेआधीच तुमची महत्वाची कामे उरकून घ्या. अन्यथा तुमचेच नुकसान होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
आधार कार्डमधील ई-मेल अपडेट
UIDAI कडून सध्या आधार कार्डमध्ये ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी पैसे स्विकारते. यासाठी तुम्हाला जीएसटीसह 75 रुपयांचा शुल्क भरावा लागतो. पण येत्या 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत आधार मोबाईल अॅपद्वारे ई-मेल अपडेट केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे. यामुळे तुम्हाला अद्याप ईमेल आयडी किंवा जुना ईमेल आयडी बदलायचा असल्यास ही सुविधा फ्री मिळणार आहे.
रेल्वे नियमांमध्ये होणार मोठे बदल
वैध तिकीट किंवा पासशिवाय प्रवास करणाऱ्यांना आता 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच रेल्वे परिसरात परवानगीशिवाय वस्तू विकणे, फेरीवाले किंवा भिकाऱ्यांना 2 हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.
धोकादायक वस्तू घेऊन प्रवास केल्यास मोठा दंड
रेल्वेने प्रवास करताना धोकादायक वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास तुमच्या विरोधात 10 हजारांची दंडात्मक कारवाई होऊ शकते. काही गंभीर प्रकरणी तुरुंगवासही होऊ शकतो. खरंतर, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जुलैपासून नियम लागू होणार आहे.
एलपीजी सिलेंडरचे दर
मध्यपूर्वेतील तणावामुळे गेल्या काही महिन्यांत एलपीजीच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. जून महिन्यात कर्मशियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 53.50 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे 1 जुलैपासून घरगुती आणि कर्मशियल एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या शिखावर होण्याची शक्यता आहे.