तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का, असं असेल तर ही बातमी आधी वाचा. दिवाळीत साखर महागण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही टेक्निकल कारणांमुळे रेशन कार्ड बंद झाले असल्यास ते तुम्ही ‘मेरा रेशन’ किंवा ‘उमंग’ ॲपच्या माध्यमातून पुन्हा सुरू करू शकतात.
कार्ड बंद होण्याचे मुख्य कारण आधार KYC अपूर्ण असणे हे असते. मोबाईलवरून आधार सीडिंगची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करून बंद झालेले रेशन कार्ड पुन्हा सहज सुरू करता येते.
रेशन कार्ड बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे eKYC किंवा आधार लिंकिंग पूर्ण नसणे हे असते. केंद्र सरकारच्या ‘UMANG’ ॲप किंवा ‘Mera Ration’ ॲप द्वारे तुम्ही ते खालील टेक्निकल पद्धतीने पुन्हा सुरू करू शकता.
‘UMANG’ ॲपद्वारे e-KYC पूर्ण करणे
गुगल प्ले स्टोअरवरून UMANG Application डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल नंबरने नोंदणी करा.
ॲपमधील सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘PDS’ टाईप करून शोधा आणि तुमचे राज्य (महाराष्ट्र) निवडा.
‘View Ration Card Details’ वर जाऊन तुमचा कार्ड नंबर टाका. कार्ड निष्क्रिय असल्यास तेथेच ‘e-KYC’ किंवा ‘Update Member Details’ चा पर्याय निवडा.
ज्या सदस्याचे KYC अपूर्ण आहे, त्याचे नाव निवडून त्याचा आधार नंबर प्रविष्ट करा.
आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा. eKYC यशस्वी होताच तुमचे कार्ड काही दिवसांत पुन्हा सक्रिय केले जाईल.
Mera Ration’ ॲपद्वारे आधार सीडिंग तपासणे
गुगल प्ले स्टोअरवरून Mera Ration App डाऊनलोड करून ते ओपन करा.
ॲपमधील ‘Aadhaar Seeding’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा रेशन कार्ड नंबर टाका.
येथे कुटुंबातील ज्या सदस्यांच्या नावापुढे लाल रंगात ‘No’ दिसत असेल, त्यांचे आधार रेशन कार्डशी लिंक नाही असे समजावे.
अशा सदस्यांचे आधार कार्ड घेऊन जवळच्या अधिकृत रेशन दुकानात (Fair Price Shop) जा आणि तेथील ePoS मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन तुमचे आधार लिंक करून घ्या, ज्यामुळे तुमचे बंद रेशन कार्ड सुरू होईल.
तुमचे रेशन कार्ड नेमके का बंद होते?
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियमांनुसार, रेशन कार्ड निष्क्रिय होण्यामागे मुख्यत्वे पुढील 3 कारणे असतात: 6 महिने धान्य न घेणे: जर एखाद्या कुटुंबाने सलग 6 महिने रेशन दुकानातून धान्य घेतले नाही, तर सिस्टीम ते रेशन कार्ड ‘सायलेंट’ किंवा इन-ॲक्टिव्ह मोडवर टाकते. अपूर्ण बायोमेट्रिक (e-KYC): कुटुंबातील सर्व सदस्यांचे अंगठ्याचे ठसे (बायोमेट्रिक) सरकारी डेटाबेसशी मॅच न झाल्यास कार्ड तात्पुरते ब्लॉक केले जाते. दुबार नाव एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या रेशन कार्डमध्ये (उदा. लग्नानंतर माहेरी आणि सासरी दोन्हीकडे) असल्यास तांत्रिक तपासणीत ते नाव बाद केले जाते.