ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट (Flipkart)ने आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवर वारंवार खरेदी करत असाल, तर आता तुम्ही तुमच्या खरेदीसोबत मनोरंजनाचाही आनंद घेऊ शकता.
कंपनी निवडक ग्राहकांना नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन फ्री देण्याच्या तयारीत आहे. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात या ऑफरबद्दल अधिक माहिती…
ही विशेष ऑफर केवळ flipkart plus मेंबर्ससाठी आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना खरेदी करण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतील, ज्यानंतर त्यांना नेटफ्लिक्स मोबाईलचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, काही ग्राहकांना फ्लिपकार्ट ॲपवर या ऑफरसाठी ‘वेटलिस्टमध्ये सामील व्हा’ (Join Waitlist) हा पर्याय देखील दिसला आहे.
फ्लिपकार्टच्या अटींनुसार, नेटफ्लिक्स फ्री मिळवण्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवर चार ऑर्डर्स द्याव्या लागतील. असे म्हटले आहे की प्रत्येक ऑर्डरची किमान किंमत ₹299 किंवा त्याहून अधिक असले पाहिजे. ही अट पूर्ण करणे सोपे आहे कारण तुम्ही फ्लिपकार्ट ॲप, फ्लिपकार्ट मिनिट्स किंवा फ्लिपकार्ट ग्रोसरी वापरून खरेदी करू शकता.
नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फ्री मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
फ्लिपकार्टची नेटफ्लिक्स फ्री ऑफर ही flipkart plus मेंबर्ससाठी आहे. त्यामुळे, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट प्लस मेंबर असणे आवश्यक आहे.
यानंतर, तुम्हाला फ्लिपकार्टवर किमान चार ऑर्डर्स द्याव्या लागतील, ज्या प्रत्येकी ₹299 किंवा त्याहून अधिक किमतीच्या असतील.
तुम्ही या ऑर्डर्स फ्लिपकार्ट ॲप, फ्लिपकार्ट मिनिट्स किंवा फ्लिपकार्ट ग्रोसरी सेक्शनमधूनही देऊ शकता.
शिवाय, जर तुम्ही या ऑर्डर्स रद्द केल्या किंवा परत केल्या, तर त्या चार ऑर्डर्समध्ये मोजल्या जाणार नाहीत.
अटी पूर्ण केल्यानंतरच फ्री नेटफ्लिक्स मिळणार
जर तुम्ही फ्लिपकार्टच्या फ्री नेटफ्लिक्स ऑफरचा लाभ घेण्याचा विचार करत असाल, तर हे लक्षात घ्या की वरील अटी पूर्ण केल्यानंतरच फ्लिपकार्ट तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाईल सबस्क्रिप्शन देईल. याचा अर्थ असा की, जर तुम्ही या ऑफरचा लाभ घेतला, तर तुम्ही फक्त तुमच्या फोनवर फ्री सबस्क्रिप्शनसह नेटफ्लिक्स पाहू शकाल. हे सब्सक्रिप्शन 30 दिवसांसाठी असणार आहे.
हा प्लॅन स्टँडर्ड व्हिडिओ क्वालिटीला सपोर्ट करतो आणि तो स्मार्ट टीव्ही किंवा मोठ्या स्क्रीनवर पाहता येत नाही. नेटफ्लिक्सच्या स्वतःच्या ॲपवर या प्लॅनची किंमत फक्त ₹149 आहे. त्यामुळे, तुम्ही ₹299 किमतीच्या चार ऑर्डर्स न देता हा प्लॅन फक्त ₹149 मध्ये खरेदी करू शकता.