लाडक्या बहिणींना आणखी एक संधी, ई-केवायसी करायला आता…लगेच घ्या फायदा, संधी हुकल्यास होईल पश्चात्ताप!

लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. काही लाडक्या बहिणींना या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये मिळत आहेत.तर काही लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. या लाडक्या बहिणींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने हे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. परंतु या लाडक्या बहिणींची संधी अजूनही गेलेली नाही.

 

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींना अनेकवेळा मुदत वाढवून देण्यात आली होती. अगदी 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येत होती. परंतु आता याच लाडक्या बहिणींना आणखी एक संधी चालून आली आहे.

 

ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पैसे आलेले नाहीत. अशा लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येणार नाही. परंतु या महिला जिल्हा महिला विकास विभागाच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता.

 

जिल्हा महिला विकास विभागात तुम्ही कागदपत्रे सादर करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता ही शेवटची संधी हुकली तर तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीतून हटवले जाऊ शकते. त्यामुळे या संधीचा लाभ आवश्य घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.