वाढत्या विजेच्या वापरामुळे घरगुती वीजबिलांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्यात एसी, कूलर आणि इतर उपकरणांमुळे बिलाचा ताण अधिक जाणवतो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने “पीएम सूर्य घर:मोफत वीज योजना” सुरू केली असून, या योजनेमुळे घरच्या घरी वीज निर्मिती करून मोठ्या प्रमाणात बचत करणे शक्य होणार आहे.
पीएम सूर्य घर योजना काय आहे?
ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना स्वतःची वीज निर्माण करण्यास सक्षम बनवणे आणि महागड्या वीज बिलांपासून दिलासा देणे. एकदा सौर पॅनेल बसवले की, अनेक वर्षे जवळपास मोफत वीज मिळू शकते.
सरकारकडून किती अनुदान?
या योजनेअंतर्गत सौर पॅनेलच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाते.
१ किलोवॅट प्रणाली : सुमारे ३०,००० रु अनुदान
२ किलोवॅट प्रणाली : सुमारे ६०,००० रु अनुदान
३ किलोवॅट किंवा अधिक : कमाल ७८,००० रु पर्यंत अनुदान
ही रक्कम थेट बँक खात्यात किंवा कर्ज खात्यात जमा केली जाते, त्यामुळे ग्राहकाचा खर्च कमी होतो.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत. जसे की,
अर्जदाराचे वय किमान २१ वर्षे असावे.
नावावर वीज जोडणी असावी.
स्वतःचे छत उपलब्ध असावे.
सिबिल स्कोअर ६८० किंवा त्याहून अधिक असावा.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
मोबाईल नंबर
वीज बिल
सौर पुरवठादाराचे कोटेशन
सौर प्रणाली कशी काम करते?
सौर पॅनेल सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करतात. दिवसा निर्माण झालेली वीज त्वरित वापरता येते, तर उरलेली वीज ग्रीडमध्ये पाठवली जाते. त्यामुळे २४ तास वीजपुरवठा मिळतो आणि बिल कमी होते.
खर्च आणि बचतीचा अंदाज
३ किलोवॅट सौर प्रणालीसाठी
एकूण खर्च : अंदाजे १.५ ते २ लाख रु
सरकारी अनुदान : ७८,००० पर्यंत मिळते.
उर्वरित खर्च : कर्जाच्या माध्यमातून भरता येतो
यामुळे काही वर्षांतच गुंतवणूक वसूल होऊन पुढील काळात जवळपास मोफत वीज मिळू शकते.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
सर्वप्रथम http://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. नंतर मोबाईल नंबर व ओटीपीद्वारे नोंदणी करा आणि प्रोफाइल पूर्ण करा.आवश्यक असल्यास विक्रेता (व्हेंडर) निवडा सोलर रूफटॉपसाठी अर्ज करा पर्यायातून अर्ज भरा. नंतर व्यवहार्यता मंजुरीनंतर बँक तपशील सादर करा.सौर प्रकल्पाची स्थापना आणि पडताळणी पूर्ण करा. डिस्कॉम तपासणीनंतर अनुदान जमा केले जाते.
मदतीसाठी हेल्पलाइन
अधिक माहितीसाठी आणि सहाय्यासाठी टोल-फ्री क्रमांक १५५५५ वर संपर्क साधता येईल.