सरकारी नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ते आता पूर्ण होणार आहे. रेल्वेमध्ये नोकरी म्हणजे लॉटरीच, त्यामुळे तुम्ही जर रेल्वेमध्ये नोकरी शोधत असाल तर ही संधी गमावू नका. भारतीय रेल्वेने बेरोजगार तरुणांसाठी आपल्या दारे खुली केली असून, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRB) टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.
या मेगा भरती अंतर्गत ६ हजार ५०० पेक्षा जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, आपल्या महाराष्ट्रातील मुंबई झोनसाठी देखील यामध्ये रिक्त जागा असणार आहेत. या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून, अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार, शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेऊया.
तारीख आताच नोटडाऊन करा!
या भरतीसाठी रेल्वेने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पूर्ण एक महिन्याचा वेळ दिला आहे. त्यामुळे तारखांची नीट नोंद करून ठेवा नाहीतर मग ती निघून गेली तर मोठं नुकसान होऊ शकतं. ३० जून २०२६ पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ जुलै २०२६ अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. रेल्वेने या भरतीमध्ये टेक्निशियनच्या दोन वेगवेगळ्या ग्रेडसाठी अर्ज मागवले आहेत.टेक्निशियन ग्रेड-१ (एकूण जागा – ३५२)
वयोमर्यादा: १८ ते ३३ वर्षे.
पात्रता: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे फिजिक्स (भौतिकशास्त्र), कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी (IT) क्षेत्रात ग्रॅज्युएशन (पदवी) असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन ग्रेड-२ (एकूण जागा – ६२४२)
वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे.
पात्रता: या पदासाठी रेल्वेच्या नियमांनुसार संबंधित ट्रेडमधील पात्रता आवश्यक आहे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल).
तुमच्या मुंबई झोनमध्ये किती जागा?
या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील वेगवेगळ्या रेल्वे झोननुसार जागांची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी सर्वाधिक संधी आहे:
सेंट्रल रेल्वे, मुंबई – ८७० जागा
वेस्टर्न रेल्वे, मुंबई – ५४४ जागा
साउदर्न रेल्वे, चेन्नई – ७८५ जागा
नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, गुवाहाटी – ७०१ जागा
साउथ ईस्टर्न रेल्वे, कोलकाता – ५७६ जागा
नॉर्दर्न रेल्वे, नवी दिल्ली – ५४८ जागा
साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद – ३६८ जागा
प्रॉडक्शन युनिट्स – ४९९ जागा
(याव्यतिरिक्त देशातील इतरही अनेक झोनमध्ये जागा रिक्त आहेत).
अर्ज शुल्क किती असेल?
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्ग, EWS आणि OBC वर्गासाठी ५०० रुपये मोजावे लागणार आहे. SC/ST आणि माजी सैनिक २५० रुपये मोजावे लागणार आहे. सर्व महिला उमेदवारांसाठी २५० रुपये फी भरावी लागणार आहे. जर अर्ज भरताना तुमच्याकडून काही चूक झाली आणि ती दुरुस्त करायची असेल, तर त्यासाठी २५० रुपये अतिरिक्त ‘करेक्शन फी’ मोजावी लागेल. त्यामुळे फॉर्म अगदी काळजीपूर्वक भरा.
निवड प्रक्रिया कशी असेल?
रेल्वेमधील या मानाच्या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना तीन प्रमुख टप्प्यातून जावे लागेल. सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाइन संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. शेवटी रेल्वेच्या निकषांनुसार वैद्यकीय तपासणी केली जाईल. या तिन्ही टप्प्यांमध्ये यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची एक फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि त्यानुसार थेट रेल्वेमध्ये नियुक्ती मिळेल.