‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरातील कोट्यवधी महिला ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट पूर्वीच महिलांच्या बँक खात्यात वर्ग केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 ची आर्थिक मदत दिली जाते. आता अवघ्या आठवड्याभरातच ही रक्कम जमा होण्याचा अंदाज असल्याने महिलांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कधी होणार निर्णय? काय आहे अपडेट?
यापूर्वी जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता जुलैच्या हप्त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मंगळवारी पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी निधी वर्ग करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर हप्ता वितरणाच्या अधिकृत तारखेबाबत अधिक स्पष्टता प्राप्त होईल.
दोन महिन्यांचे 3000 रुपये एकत्र मिळणार?
जर 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांची एकत्रित 3,000 रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते, असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सरकारी घोषणा झालेली नाही.
ई-केवायसीमुळे 80 लाख महिला अपात्र?
राज्यभरात राबवण्यात आलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता धूसर आहे. दुसऱ्या बाजूला, सर्व पडताळणी पूर्ण झालेल्या राज्यातील तब्बल 1 कोटी 66 लाख पात्र महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होण्याची चिन्हे आहेत. परंतु जुलै महिन्याचा 1,500 चा हप्ता मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
कोणत्या महिलांना मिळणार 1500 रुपये?
ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
ज्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरीत्या पार पडली आहे.
ज्या महिला योजनेच्या सर्व निकषांमध्ये आणि पात्रतेत बसतात.
ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा कागदपत्रांच्या छाननीत त्रुटी आढळल्या आहेत, त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो.
ई-केवायसी अपूर्ण असलेल्या किंवा कागदपत्रांच्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ थांबू शकतो. यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी आणि पात्रतेची स्थिती वेळेत तपासून घेणे गरजेचे आहे.