पोस्ट ऑफिसमध्ये 23,757 नोकऱ्यांची मोठी भरती! 10वी पास तरुणांना संधी; अर्ज प्रक्रिया सुरू

Post Office GDS Recruitment 2026: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी तब्बल 23,757 जागांची भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी किमान 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. BPM, ABPM आणि डाक सेवक या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

🎓 10वी पास असाल तर संधी सोडू नका!

उमेदवाराकडे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे.

💰 अर्ज शुल्क किती?

General, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹100 आहे. महिला, SC, ST, PWD आणि Transwomen उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
आता घराघरात पोहोचणार PNG! केंद्र सरकारची नवी योजना; कधीपासून होणार अंमलबजावणी?

📅 अर्ज कधीपर्यंत करता येणार?

ऑनलाइन एक-वेळ नोंदणी 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान करता येईल. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 2 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अर्जात दुरुस्ती करण्याची संधी 23 आणि 24 सप्टेंबर 2026 रोजी मिळणार आहे.

20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षांत कसं फेडायचं? या 5 उपायांनी लाखोंचं व्याज वाचवा

📌 नोकरी कुठे मिळणार?

ही भरती संपूर्ण भारतासाठी असून निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय डाक विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथ क्लिक करा 

👉 तुमच्या घरातील किंवा मित्रपरिवारातील 10वी पास उमेदवारांना ही माहिती नक्की शेअर करा.
💬 तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार आहात का? कमेंटमध्ये सांगा!