सोमवार, 20 तारखेपासून जुलै महिन्याचा चौथा आठवडा सुरू होत असताना बँक ग्राहकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 20 जुलै ते 26 जुलै 2026 या कालावधीत देशातील काही भागांमध्ये बँका एकूण तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याआधी जाणून घ्या पुढच्या आठवड्यात तुमच्या शहरात बँका कढी सुरू असणार आणि कधी बंद असणार.
20 ते 26 जुलैदरम्यान बँका कधी बंद राहतील?
बुधवार -22 जुलै 2026 : त्रिपुरामध्ये खर्ची पूजा असल्याने बँका बंद राहतील.
शनिवार – 25 जुलै 2026 : चौथ्या शनिवार असल्याने बँकेच्या नियमानुसार या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद असणार आहे.
रविवार – 26 जुलै 2026 -साप्ताहिक सुट्टी असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.
महाराष्ट्रात कधी सुट्टी
महाराष्ट्रातील बँका पुढील आठवड्यात केवळ 25 आणि 25 जुलै हे दोनच दिवस बंद असणार आहे. त्यातही चौथा शनिवार आणि रविवारची ही सुट्टी आहे. त्यामुळे या आठवड्यात बँकांना कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.
कोणत्या दिवशी बँका सुरू
येत्या आठवड्यात 20 जुलै (सोमवार), 21 जुलै (मंगळवार), 23 जुलै (गुरुवार) आणि 24 जुलै (शुक्रवार) या दिवशी बहुतांश भागांमध्ये बँकांचे कामकाज नियमित सुरू राहील.
ऑनलाइन सेवा सुरू
पुढच्या आठवड्यात काही दिवस बँकेच्या शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध राहतील. ग्राहक UPI, NEFT, RTGS, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे आणि ऑनलाइन व्यवहार करणे सुरू ठेवू शकतात.
त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायचे काम असल्यास ग्राहकांनी RBI च्या सुट्टीच्या यादीची माहिती घेऊन नियोजन करणे महत्त्वाचे आहे.