2002 ला VOTER ID च बनला नाही, मग SIR चा फॉर्म कसा भरायचा? सोप्पी ट्रिक समजून घ्या

महाराष्ट्रासह देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण (SIR) सूरू झाले आहे.या एसआयआरमध्ये बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) तुम्हाला एक फॉर्म देणार आहेत, जो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून भरून सबमिट करायचा आहे.पण हा फॉर्म भरताना 2002च्या एसआयआर यादीचा तपशील तुम्हाला द्यावा लागणार आहेत.त्यामुळे अनेकजण संभ्रमात पडले आहेत.काहींच म्हणण आहे, आमचा त्यावेळी वोटींग कार्डच बनलं नाही, मग तपशील कसा द्यायचा?

 

अशा तरुण तरुणींनी एसआयआर फॉर्म कसा भरायचा? हे जाणून घेऊयात.

 

पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मागे सांगितल्या प्रमाणे तुमच्या प्लेस्टोरवर जायचंय आहे आणि त्यात ECINET हा ॲप Install करायचा आहे. या ॲपवरून तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता.पण ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि वोटर आयडीवर नाव सेम असणे गरजेचे आहे. त्यात नावाच जर छोटीशी चुक जरी असेल तर ते शक्य होणार नाही आहे.त्यामुळे अशा मतदारांना ऑफलाईन फॉर्म भरण्याचा पर्याय निवडणे फायद्याचे ठरेल.

 

आता ॲप Install झाल्यानंतर तु्म्हाला पहिल्यांदा तुमचा 2002 च्या एसआयआर यादीतला तपशील शोधायचा आहे. आता जर 2002 च्या आधी तुमचा जन्म झाला होता, पण वोटींग कार्ड बनवण्याच तुमचं वयच झालं नव्हतं.तर तुमचं नाव 2002 च्या एसआयआर यादीत असणारच नाही आहे.कारण त्यावेळी तुमच्याकडे वोटींग कार्ड नव्हतं.पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला तुमचं नाव नाही तर तुमच्या आई वडिलांच नाव 2002 च्या एसआयआर यादीत शोधायचं आहे. हा तपशील तुम्हाला कामाला येणार आहे.

 

हा तपशील कसा शोधायचा?हे समजूयात. ECINET ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील पण तुम्हाला पहिल्यांदा 2002च्या लिस्टमध्ये तुमची आई किंवा वडील यांचे नाव शोधायचे आहे.आई वडिल नसले तर नातेवाईकांची नाव शोधा. हे नाव शोधताना तुम्हाला आई वडिलांच्या संपूर्ण माहिती तिथे भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला आई वडिलांची माहिती मिळणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर त्याचा स्किनशॉट घ्या, कारण फॉर्म भरताना तुम्हाला हा स्किनशॉट लागणार आहे.