आपल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदे विभागात रिक्त पदाच्या आणि मनुष्यबळा अभावी नागरिकांना सेवा, सुविधेच्या अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा परिषदेतंर्गत या दहा विभागात मिळून ११ हजार ८०९ पद मंजूर आहेत.
सद्यास्थितीत ९ हजार ६७७ जागा 3 भरलेले असून २ हजार १३२ पदे रिक्त अल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात वर्ग ३ ची १ हजार ८८१ तर वर्ग ४ ची २५१ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाची ७१२ पदे रिक्त गावांमध्ये आरोग्य सेवा तात्काळ पोहचण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या विविध विभागातून कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर तितक्या जागा लागलीच भरल्या जात नाही. यामुळे रिक्त जागांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. १५२५ मंजूर पदांपैकी ४० टक्के म्हणजे ७१२ पदे रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कमी मनुष्यबळावर आरोग्य सेवा सुरू आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ सहाय्यक, लिपिकां आणि अन्य महत्वाची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी पदे सन २०२३ पासून रिक्त असून, त्यामुळे कार्यरत लिपिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही पदे तातडीने भरावीत, अशी ठाम मागणी होत आहे .
कृषी विभागात सरळ सेवेची १५ पदे भरली, तर पदोन्नतीची २१ पैकी १४ भरली असून ७ रिक्त आहेत, बांधकाम विभागातही रिक्त पदांची संख्या मोठी आहे. सरळ सेवेची १३० मंजूर पदांपैकी ८९ भरली. ४१ रिक्त अहेत. पदोन्नतीची ६३ पैकी २१ भरली, तर ४२ रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात सरळ सेवेची ५८ पैकी ३५ पदे भरली, तर २३ रिक्त आहेत. पदोन्नतीची २९ पैकी १७ भरली, तर १२ रिक्त आहेत. महिला व बालकल्याण विभागात सरळ सेवेची ३१ पैकी २९ पदे भरली, तर पदोन्नतीची ३१ पैकी २० पदे भरली. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सर्वाधिक रिक्त पदे शिक्षण विभागात – शिक्षण विभागात जिल्ह्यात ५१३० पदे मंजूर असून ४८०४ पदे भरली आहेत, तर ३२६ पदे रिक्त आहेत. या विभागात पदोन्नतीची ६५० पदे असून ५५९ भरली आहेत. ९१ रिक्त आहेत.
सरळसेवेच्या ९१०, तर पदोन्नतीच्या २९१ जागा रिक्त – जिल्ह्यात वर्ग ३ व ४ च्या सरळ सेवेच्या एकूण ७२६७ जागा मंजूर असून ६३५७भरल्या. ९१० जागा रिक्त आहेत. पदोन्नतीच्या १२७५ जागा मंजूर असून १००८ भरल्या. अजून २९१ रिक्त आहेत.
वर्ग ४ च्या पदांची अडचण
सध्या शासनाने वर्ग ४ ची पदे भरण्यास मनाई केली आहे. यात सरळ सेवेची ६१८ पैकी ३५२ भरली असून २६६ रिक्त आहेत. यात प्रामुख्याने शिपाई व वाहनचालकांची पदे आहेत. या पदांची भरतीच होत नसल्याने या रिक्त जागा केवळ दाखविण्यापुरत्याच राहिल्या आहेत.
संवर्गाचे नाव सुधारणा
विस्तार अधिकारी (कृषि विस्तार अधिकारी (कृषि) या संवर्गामध्ये ज्यांनी
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केली असेल असे उमेदवार अर्ज करू शकतील असे जाहिरातीत नमूद केले आहे. तथापि आता त्यामध्ये खालील पदवी धारण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतील.
१) बी.एससी (ऑनर्स) उद्यानविद्या
२) बी.एससी (ऑनर्स) वनविद्या
३) बी.एससी (ऑनर्स) समाजिक विज्ञान
४) बी. एफ. एससी (मत्स विज्ञान)
५) बी.टेक (कृषि अभियांत्रिकी)
६) बी.टेक (अन्न तंत्रज्ञान)
७) बी.टेक (जैव तंत्रज्ञान)
८) बी.एससी (एबीएम) / बी.बी.एम.(कृषि) / बी.बी.ए. (कृषि) / बी.एससी (ऑनर्स) कृषि व्यवसाय व्यवस्थापन
तारतंत्री तारतंत्री या संवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतील असे जाहिरतीत नमूद केलेले आहे. परंतू ऑनलाईन अर्ज सादर करताना I. T. I. झालेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यास अडचण निर्माण झालेली होती.
तथापि आता त्यामध्ये सुधारणा करणेत आलेली असून महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवारांसोबत इतर अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी Other असा पर्याय उपलब्ध करून देणेत आलेला आहे.
विस्तार अधिकारी (शिक्षण) विस्तार अधिकारी (शिक्षण) या संवर्गामध्ये ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतरचा ग्राह्य धरला जात होता.
तथापि आता सदर पदाचा ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीचा असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे.
कनिष्ठ सहाय्यक / (लेखा)
कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गासाठी मराठी टंकलेखन आवश्यक करण्यात आलेले आहे, असे जाहिरातीत नमूद आहे.
तथापि माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन १९९१ चे जनगणना कर्मचारी, सन १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी, पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी व अनाथ मधून अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांकडे मराठी टंकलेखन नाही, असे उमेदवार देखील अर्ज करू शकतील.
स्थापत्यअभियांत्रिकी
सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाचा ऑनलाईन अर्ज करताना Have you passed recognized equivalent two Years Course in Construction Supervisor ? असा प्रश्न विचारणेत आला होता. परंतू सदरचा कोर्स हा एक वर्षाचा असल्यामुळे त्या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकत नव्हते.
तथापि त्यामध्ये सुधारणा करणेत आली असून आता Have you passed recognized equivalent Course in Construction Supervisor ? असा प्रश्न विचारणेत येत आहे. त्यामुळे सदर पदासाठी इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतील.
कंत्राटी ग्रामसेवक / पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्रामसेवक / पशुधन पर्यवेक्षक या संवर्गामध्ये संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात असे जाहिरातीत नमूद आहे.
आता त्याचबरोबर जे उमेदवार दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील.
किंवा
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) मार्फत मान्यताप्राप्त सर्व पदवी व पदवीका (सर्व अभियांत्रिकी शाखा) प्राप्त उमेदवार
किंवा
इंडियन सटिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन (ICSC) यांच्या मार्फत मान्यताप्राप्त इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील.
वरीलपैकी कोणत्याही एक प्रकारे संगणक व माहिती तंत्रज्ञानाबाबतचे प्रमाणपत्र धारण करीत असतील असे उमेदवार सदर पदासाठी अर्ज करू शकतात.
Who Can Apply For Maha RDD ZP Bharti
अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात.
जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, असे उमेदवार आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. मकसी १००७/ प्र.क्र.३६/का. ३६ दिनांक १० जुलै २००८ अन्वये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) पदांसाठी अर्ज करू शकतात.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात.
१. शासन अधिसूचना दि. २९/०८/२०१९ नुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.
२. स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ, जे उमेदवार स्वत: किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे मातापिता किंवा आजी-आजोबा हे दिनांक २६ जानेवारी १९५० पासून आजपर्यंत संबंधित जिल्ह्यांच्या अनुसूचित क्षेत्रांत सलगपणे राहत आले आहेत, असे अनुसूचित जमातीचे उमदेवार, असा आहे.
३. अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांकडे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक (मूळ) रहिवासी असल्याबाबतचा महसूली पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमदेवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसूली पुराव्याबाबत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रात (पेसा) नियुक्ती दिली जाईल.
४. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ठ – १ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात अलेली आहेत.
५. महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक आविवि – २०२३/ प्र.क्र.१३२/का-१४, दि. १६/०६/२०२३ अन्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचा रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक राहील.
६. ज्या उमेदवारांची पेसा क्षेत्रामध्ये निवड होईल त्या उमेदवारांची बिगर पेसा क्षेत्रामध्ये बदली करता येणार नाही.
७. जाहिरातीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील भरावयाची पदे ही महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८ / प्र.क्र.४२७/१६-ब, दि. १० मे, २०२३ नुसार दर्शविणेत आलेली आहेत.