आजच्या काळात शिक्षण, घराची दुरुस्ती, वैद्यकीय खर्च, व्यवसाय किंवा इतर गरजांसाठी अनेकजण Personal Loan घेतात. मात्र कर्ज घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास भविष्यात आर्थिक अडचणी टाळता येऊ शकतात.
सर्वप्रथम, कर्जाची रक्कम आपल्या गरजेनुसारच घ्या. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतल्यास त्याचा EMI दीर्घकाळ भरावा लागतो आणि आर्थिक ताण वाढू शकतो. त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा योग्य अंदाज घेऊनच निर्णय घ्या.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे व्याजदर (Interest Rate). प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्थेचा व्याजदर वेगळा असतो. त्यामुळे एकाच ठिकाणी अर्ज न करता विविध बँकांच्या ऑफर्सची तुलना करणे फायदेशीर ठरते. कमी व्याजदरामुळे एकूण परतफेडीची रक्कमही कमी होते.
तिसरी गोष्ट म्हणजे कर्जाशी संबंधित अतिरिक्त शुल्क. Processing Fee, Foreclosure Charges, Late Payment Charges यांसारखी शुल्के किती आहेत, हे आधीच तपासा. अनेकजण फक्त EMI पाहतात, पण इतर शुल्कांकडे दुर्लक्ष करतात.
कर्ज मंजूर होण्यासाठी तुमचा CIBIL Score देखील महत्त्वाचा असतो. चांगला CIBIL Score असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते आणि व्याजदरही कमी मिळू शकतो. त्यामुळे वेळेवर EMI आणि क्रेडिट कार्डची बिले भरून CIBIL Score चांगला ठेवणे आवश्यक आहे.
EMI आपल्या मासिक उत्पन्नाच्या मर्यादेत असावा. तज्ज्ञांच्या मते, सर्व कर्जांचे एकूण EMI हे मासिक उत्पन्नाच्या 40 ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावेत. त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत.
ऑनलाइन कर्ज घेताना फक्त RBI नोंदणीकृत बँक किंवा अधिकृत NBFC कडूनच कर्ज घ्या. अनोळखी अॅप किंवा वेबसाइटवर वैयक्तिक माहिती देणे टाळा, कारण फसवणुकीच्या घटना वाढत आहे