इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, मुली पुन्हा चमकल्या! कुणाची बाजी, कुणाची हाराकिरी?

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. पत्रकार परिषदेत या निकालाचा घोषवारा जाहीर करण्यात आला. अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी निकालाची घोषणा केली. आज 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होईल. बारावीचा निकाल 2 मे रोजी लागला. त्यानंतर आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळाच्या आणि बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांसह पालकांना पाहता येईल. राज्यात १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावीत उत्तीर्ण झाले. राज्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला. इयत्ता 12 वी प्रमाणेच इयत्ता 10 वीचा निकाल 2 टक्क्यांनी घसरला आहे. कोकण विभागाने इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाला इयत्ता दहावीत सूर गवसला नाही.

 

दहावीचा निकाल ९२.०९ टक्के

राज्यात इयत्ता दहावीला १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता दहावीची टक्केवारी ९२.०९ इतकी आहे. एकूण २८ हजार २५ विद्यार्थी फॉर्म नंबर १७ भरून बसले. त्यापैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण. ७६.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर २८ हजार ८६७ विद्यार्थी बसले. त्यापैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी पास झाले. ३३. ८९ टक्केवारी उत्तीर्ण झाले. म्हणजे परीक्षेत एकूण सर्व मिळून १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला. दिव्यांग विद्यार्थी ९ हजार ९१२ बसले. त्यापैकी ९ हजार ४२ पास झाले. ९१.२२ टक्के निकाल जाहीर झाला.

 

बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीत मुली चमकल्या

 

इयत्ता बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीत मुली चमकल्या आहेत. मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.९६ टक्के आहे. तर ८९.५६ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. मुलांपेक्षा ५.४० टक्के मुलींचा निकाल अधिक. ६४ विषयाची परीक्षा घेतली. २० विषयाचा निकाल १०० टक्के लागल्याचा माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

कोकण विभागाने मारली बाजी

 

कोकण विभाग टॉपला आहे. एक नंबरवर आहे. कोकण विभागाची टक्केवारी ९७.६२ टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला. या विभागाची टक्केवारी ८८.४१ टक्के इतकी आहे.

 

नागपूर 89.07 टक्के

 

छत्रपती संभाजीनगर 88.41 टक्के

 

मुंबई 94.97 टक्के

 

कोल्हापूर 95.47 टक्के

 

अमरावती 90.50 टक्के

 

नाशिक 90.93 टक्के

 

लातूर 88.42 टक्के

 

कोकण 97.62 टक्के

 

राज्यातील एकूण टक्केवारी 92.09

 

राज्यात नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,२२,८५१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

 

४,३१,१६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

 

३,८०,४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

 

१,३४,१३४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण

 

राज्यातील २३,६१२ माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी केली

 

त्यापैकी १५,५५,०२६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती

 

राज्यातील ६,६१२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला

 

मार्च २०२३, मार्च २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षांतील नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात वाढ झाली