लाडकी बहीण’ योजनेची रक्कम वाढणार? पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचा सल्ला

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अनेक नामांकित अर्थतज्ज्ञांकडून आक्षेप नोंदवले गेले असले तरी, या योजनांचे उघड समर्थन करणारे आणि यामुळे महिलांची बचत आणि कुटुंबावरील खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगणारे मत खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने सोमवारी व्यक्त केले. इतकेच नव्हे तर वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार, थेट बँक खात्यात जमा होणारी सध्याची १५०० रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही, हे तपासण्यासाठी या योजनेचे मूल्यमापन करावे आणि त्यात बदल केले जावेत, असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटला आहे.

 

विविध राज्य सरकारांतर्फे महिलांसाठी राबवल्या जाणार्‍या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनांचा महागाई आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी पुनर्विचार केला पाहिजे, असे समितीने चर्चापत्रात म्हटले आहे. या अहवालात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशामधील सुभद्रा योजना या प्रामुख्याने दोन मोठ्या योजनांचे सवस्तिर मूल्यमापन करण्यात आले आहे.

 

अहवालातील महत्त्वाचे नष्किर्ष

या योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यातील शल्लिक रकमेत महाराष्ट्रात ८४ टक्के तर ओडिशात ४५ टक्के वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या मासिक खर्चात अनुक्रमे ४६ टक्के आणि २८ टक्के वाढ झाली आहे. महिलांच्या हातात पैसे आल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारली असून, त्यांचा खर्चाचा ताण कमी झाला आहे. महाराष्ट्रात अशा पुरुष नातेवाईकांच्या बँकेतील शिलकीमध्येही २३ टक्के वाढ तर खर्चात ४९ टक्के घट नोंदवण्यात आली आहे.