शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

देशातील लाखो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) 24 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा 2,000 रुपये जमा होणार आहेत.

 

23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी करण्यात आला होता. सध्या 24 व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी मागील काही वर्षांचा अंदाज घेतला तर ऑक्टोबर 2026 मध्ये हा हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

चार महिन्यांनी हप्ता

 

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

 

आतापर्यंत या योजनेतून 23 हप्ते वितरित करण्यात आले असून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 4.28 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट जमा केला आहे.

 

24 वा हप्ता कुणाला?

 

24 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. यात –

 

अर्जदार भारतीय नागरिक असावा.

 

अर्जदाराच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी.

 

आयकर भरणारे नागरिक या योजनेस पात्र नाहीत.

 

दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे निवृत्त कर्मचारीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

 

ई-केवायसी अत्यावश्यक

 

योजनेचा पुढील हप्ता अडथळ्याशिवाय मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नसेल, ते PM Kisan पोर्टलवर जाऊन OTPच्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीनेही ई-केवायसी अपडेट करता येते.

 

लाभार्थी यादीत नाव कसं तपासाल?

 

तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का, हे सहज तपासता येते. यासाठी –

 

PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

‘Know Your Status’ किंवा ‘Beneficiary List’ या पर्यायावर .

 

नोंदणी क्रमांक किंवा राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरून स्टेटस तपासा.

 

तसेच जर या योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास 155261 किंवा 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.