पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्किम; एकदाच पैसे गुंतवा अन् दरमहा मिळवा ₹१० हजारचे नियमित उत्पन्न..!

तुम्ही कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीसह दरमहा ठराविक उत्पन्नाचा पर्याय शोधत असाल, तर भारतीय टपाल विभागाची एक योजना तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. पोस्ट ऑफिसची अत्यंत लोकप्रिय असलेली ‘मंथली इन्कम स्कीम’ म्हणजेच ‘मासिक उत्पन्न योजना’ गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित कमाईची हमी देते.

 

या सरकारी योजनेत एकदाच एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही दरमहा जवळपास १०,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न पक्के करू शकता.

 

सरकार घेते सुरक्षेची पूर्ण हमी

 

शेअर बाजारातील चढ-उतारांच्या काळात पोस्ट ऑफिसच्या योजनांना ‘रिस्क-फ्री’ (जोखीममुक्त) मानले जाते, कारण या गुंतवणुकीवर थेट केंद्र सरकारची सुरक्षा गॅरंटी असते. यामुळेच ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीयांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय आहे.

 

एकाच खात्यात ९ लाख, तर संयुक्त खात्यात १५ लाखांची मर्यादा

 

पोस्ट ऑफिस एमआईएस योजनेअंतर्गत तुम्ही वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडू शकता. या योजनेत गुंतवणुकीच्या मर्यादा खालीलप्रमाणे आहेत:

 

सिंगल अकाउंट (वैयक्तिक खाते): या खात्यात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत एकरकमी गुंतवणूक करू शकते.

 

जॉइंट अकाउंट (संयुक्त खाते): तीन व्यक्ती एकत्र येऊनही हे खाते उघडू शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 

७.४% व्याजदर; पण ‘हे’ नियम माहीत असणे गरजेचे

 

सध्या या योजनेवर सरकारकडून ७.४ टक्के प्रतिवर्ष दराने उत्तम व्याज दिले जात आहे. या व्याजाची रक्कम दरमहा गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी खाते मॅच्युरिटीपर्यंत (५ वर्षे) चालू ठेवणे फायदेशीर ठरते. खाते उघडल्यापासून १ वर्षाच्या आत ते बंद करण्याची परवानगी नाही. जर खाते १ ते ३ वर्षांच्या दरम्यान बंद केले, तर जमा रकमेतून २ टक्के रक्कम कापून उर्वरित पैसे परत दिले जातात.

 

३ वर्षानंतर खाते बंद केल्यास दंड…

 

दरमहा ₹९,२५० रुपयांची कमाई कशी होणार? (गणित समजून घ्या)

 

जर तुम्हाला या योजनेतून दरमहा कमाल उत्पन्न मिळवायचे असेल, तर तुम्हाला ‘जॉइंट अकाउंट’चा पर्याय निवडावा लागेल.

 

एकरकमी गुंतवणूक: ₹ १५,०००,०० (१५ लाख रुपये – कमाल मर्यादा)

 

चालू व्याजदर: ७.४% (वार्षिक)

 

५ वर्षांतील एकूण व्याज: ₹ ५,५५,००० (५ लाख ५५ हजार रुपये)

 

वार्षिक उत्पन्न: ₹ १,११,०००

 

मासिक उत्पन्न (दरमहा मिळणारी रक्कम): ₹ ९,२५०

 

थोडक्यात काय तर… जर तुम्ही जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवले, तर पुढील ५ वर्षांसाठी तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये घरबसल्या मिळत राहतील आणि ५ वर्षांची मुदत संपल्यानंतर तुमची मूळ १५ लाख रुपयांची रक्कमही तुम्हाला सुरक्षित परत मिळेल.