अ‍ॅमेझॉनची बंपर ऑफर! आयफोनवर मिळतंय तगडं डिस्काऊंट, क्रेडिट कार्डधारकांसाठी एक्स्ट्रा बेनिफीट

अ‍ॅ‍ॅपलच्या आगामी आयफोन एअर २ संदर्भातील चर्चा जोरात सुरू असतानाच सध्या बाजारात उपलब्ध असलेला आयफोन एअर अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अ‍ॅमेझॉनवर आयफोन एअरच्या खरेदीवर २२ हजारांपेक्षा जास्त डिस्काऊंट मिळत आहे.

 

शिवाय, निवडक बँकच्या क्रेडिट कार्डधारकांना अतिरिक्त सूट दिली जात आहे. प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

 

भारतात आयफोन एअर १ लाख १९ हजार ९०० रुपयांत लॉन्च करण्यात आला. मात्र, अ‍ॅमेझॉनवर हा फोन सध्या ९६ हजार ९९० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना थेट २२ हजार ९१० रुपयांची सवलत मिळत आहे. याशिवाय, एसबीआय, एक्सिस आणि आयसीआयसी बँकच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना ४ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. त्यामुळे फोनची किंमत ९२ हजार ९९० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

 

एक्स्चेंज ऑफर आणि ईएमआयचा पर्याय

 

अ‍ॅमेझॉन या फोनवर ग्राहकांना ईएमआयचा पर्यायही देत आहे. ग्राहक दरमहा ३ हजार ४१० रुपये ईएमआयचा पर्याय निवडू शकतात. तसेच, जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ३९ हजार ५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस मिळू शकतो. मात्र, एक्स्चेंजची जुन्या फोनचा ब्रँड, मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असेल.

 

खरेदीसाठी योग्य वेळ?

 

हलका, स्टायलिश डिझाइन, फ्लॅगशिप दर्जाची कामगिरी आणि सध्या सुरू असलेल्या आकर्षक ऑफर्समुळे आयफोन एअर खरेदी करण्यासाठी हा योग्य काळ मानला जात आहे. ज्यांना अ‍ॅपल इकोसिस्टमचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही डील फायदेशीर ठरू शकते. अ‍ॅमेझॉन सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहक आयफोनसह अँड्ऱॉईड स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस २५ प्लस, सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा आणि शाओमी १४ अल्ट्रा यांसारखे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकतात.