महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) 19 जुलै ते 23 जुलै दरम्यानचा नवा अंदाज जाहीर केला आहे
यामध्ये अनेक जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण, विदर्भ परिसरात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 19 जुलै रोजी कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे.
16 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने 19 जुलै रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळचा समावेश आहे.
मुंबईत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 19 जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुढील हवामानाचा विभागवार अंदाज
19 जुलै
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मेघगजजनेसह वीजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मेघगजजनेसह वीजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मेघगजजनेसह वीजाचा कडकडाट होण्याची शक्यता.
20 जुलै
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
21 जुलै
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
22 जुलै

23 जुलै